Posts

Showing posts from April, 2020

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

Image
वार्षिक परीक्षा संपली कि आम्ही वाट पाहतच असतो कि कधी सुट्टी पडतेय आणि आम्ही गावी जातोय. आणि ऊन्हाळा  चालू झाला कि गर्मी पण खूप वाढते. परीक्षा संपल्या कि सर्व लोक मे महिन्यामध्ये सुट्ट्टीचा आनंद घेण्यासाठी गावी जातात. तसेच गावी गेलो खूप आंबे ,करवंद ,जांभूळ, काजू  खायला भेटतात. तसेच मे महिन्यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळायला भेटतात. गावाकडे  गेलो कि दररोज क्रिकेट खेळायला भेटायच. दुसऱ्या गावांसोबत आम्ही मैच लावायचो.तसेच गावाकडे लपाशपी,लगोरशी,विटीदांडू,चोर पोलीस आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत पत्ते खेळायचो.गावाला गेल्यावर खूप मजा करायचो. त्यात गावी गेल्यावर समुद्रावर जात असें संध्याकाळी सूर्य मावळताना बगण्याची मजा वेगळीच असते तो लाल रंगाचा सूर्य  हळूहळू केव्हा खाली डुबतो तेच समजत नाही.मग रात्र होते मग सगळे घरी जातात. मग परत  दुसऱ्या दिवशी सूर्य पूर्वेकडून उगवतो.मग मे महिन्याच्या सुट्टीत दिवस कधी निगुन जातात  समजतच नाही. गावी गेल्यानंतर आम्ही सर्वजण आंबे आणायला जंगला मध्ये जायचो. आंब झाडावर पिकलेला दिसला कि आम्ही  दगडी मारून पाडायचो.त्यामध्ये पण एक वेगळीच पद्धत असायची.जो पहिला आंबा

Shimga Festival 2020||कोकणातील शिमगा ,होळी ,पालखी नाचवणे

Image
  होळी हा सण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात साजरा केला जातो . महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करण्याची पद्धत आहे. कोकणातली होळी एक दोन दिवसाची नव्हे तर संपूर्ण आठवडाभर असते.  कोकणामध्ये शिमगा चालू झाला कि कोकण आणि गोवा या भागात सांस्कृतिक सोहळे रंगतात. संकासुर यांचं आगमन होत. गावाला प्रत्येकाच्या घरी संकासुर येतो. काही संकासुर त्यांच्या आजूबाजूच्या गावात जाऊन आपली संस्कृती दाखवतात. तिकडे जाऊन नाचतात. आपली पापरंपारिक   संस्कृती टिकवून ठेवतात.गावाच्या देवळा मध्ये पालखी सजवली जाते. गावातील सर्व लोक तिथे उपस्थित असतात . पालखी सजवून झाली का तिची पूजा करतात. मग तिला नाचवत गावामध्ये आणली जाते. गावामध्ये आणल्या नंतर पालखीला नाचवल जात मग पालखी प्रत्येकाच्या घरी घेऊन जातात तिची पूजा करतात.             कोकणात होळी काही ठिकाणी होळीच्या रात्री होळी जाळली जाते तर काही ठिकाणी सकाळी जाळी जाते. होळी जाळ्याच्या आधी होळीच्या गोल  पालखी नाचवली जाते. नंतर मग होळीला आग लावली जाते . मग काही लोक  होळीमध्ये  नारळ टाकतात. होळीभोवती फेऱ्या मारत बोंबा मारल्या जातात  अशा प्रकारे कोकणामध्ये

हिरवगार डोंगरातून वाहणारे कोकणचे धबधबे

Image
कोकणातील  हिरवेगार डोंगर आणि त्या डोंगरांमधून वाहणारे सुंदर  धबधबे  कोकणातील पावसामुळे कोकणचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत.  कोकणामध्ये पाऊस पडायला लागला कि पावसाळी पर्यटना साठी लोकांची गर्दी कोकणात होते. कोकणामध्ये  एवढे धबधबे  आहेत कि सांगताच येत नाही. मी गावी असताना पाहिलेला छोटासा दाट हिरवगार जंगलातून वाहणारा धबधब्याचे  सौंदर्य पाहून माझ मन आनंददायी झाल.    पावसाळ्यात धबधबा लांबून पहिला तर असं वाटत कि दोन डोंगरण मधून दूध पडतय.  कारण त्याचा रंग एवढा पांढरा असतो कि लांबून पाहिल्यावर वाटत दूधच पडतय.  धबधब्यांमध्ये भिजण्याचा त्यात अंगोळ करण्याची माझ्या वेगळीच असते. हेच छोटे  छोटे  धबधबे मिळून एक मोठी नदी तयार होते.  काही धबधबे एवढे मोठे आहेत त्यांना बगण्याचा आनंद आपण लांबूनच घेऊ शकतो . आपण धबधब्याच्या  बाजूला असलो कि तिथून घरी जायच मनच होत नाही. असा होता मी पाहिलेला धबधबा. 

कोकणातील करवंद

Image
एप्रिल मे महिना चालू झाला कि करवंद पिकायला सुरवात होते. जेव्हा करवंद कच्चे असतात तेव्हा आपण त्यांच्यापासून चटणी बनवू शकतो. जेव्हा करवंद कच्चे असतात तेव्हा त्यांचा रंग हिरवा असतो. आणि पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. पिकलेली करवंद खायला एवढी गोड असतात कि तुम्ही पोटभर खात बसाल. आणि काही करवंद आंबट सुद्धा असतात. आम्ही करवंद आणायला जंगला मध्ये जायचो तेव्हा करवंद काढायचो तेव्हा हातांना काटे लागायचे. ते संपूर्ण झाड काटेरी असायच म्हणून करवंद काढताना थोडी काळजी  घ्यावी. पिकलेल्या  करवंदना चांगल सुकवून आपण त्यांना खाऊ शकतो. आणि आपण सुकवलेली करवंद दोन तीन महिने खराब होत नाही.कोकणामध्ये एप्रिल आणि मे हा करवंदांचा हंगामा आहे. कोकणामध्ये करवंद खूप पाहायला मिळतात.           

गावाकडची शेती

Image
पावसाळा ऋतू  चालू झाला कि कोकणामध्ये  शेती करायला सुरवात होते.जुन महिन्यात पाऊस पडायला सुरवात झाली कि शेतकरी पेरणी करायला सुरवात करतो. ते झालं कि दोन तीन आठवड्या नंतर भात लावणी ला सुरवात होते. त्या आधी शेतकरी शेतामध्ये नांगर धरतो. नंतर भात लावणीला सुरवात होते. आणि कोकणामध्ये शेतीची लागवड खूप केली जाते. कोकणातला शेतकरी संपूर्ण पणे शेतीवर अवलंबुन असतो. कोकणामध्ये  वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. कोकणमधला प्रत्येक माणूस शेती करतो.             मानवी  जीवनात  शेतीचा खूप मोठा वाटा आहे.  आणि आपल जीवन संपूर्ण पणे  शेतीवर अवलंबून आहे.  शेतीमध्ये पण विविध प्रकारची कामे असतात. उदा ..नांगरणी ,पेरणी ,कापणी ,लावणी ,रगडनी (मळणी   अशाप्रकारे कोकणामध्ये शेती केली जाते . 

कोकणातील गणेशोउत्सव

Image
गणेशोउत्सव हा सण  दरवर्षी प्रमाणे कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  साजरा केला जातो. गणपती हा सण जवळ आला कि मुंबई मधून खूप लोक गावाकडे जातात कारण कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी गणपती आणला जातो . प्रत्येक जण आपल्या गणपती साठी वेगवेगळी सजावट करतो. प्रत्येकाच्या  देवघरात मंडपी बांधण्याची पद्धत आहे. मंडपी म्हणजे  गणपती बाप्पाच्या डोईवरचं छत. तेरडा, सुपारी, हिरणीची फुलं,दुर्वा   त्या काळात उपलब्ध असलेल्या निर्सगातल्या सुंदर  सौंदर्याने बाप्पालाही सजवलं जातं .   .गणपती घरी आला कि त्याची पूजा केली जाते.पूजा करून झाल्यावर मग आम्ही सर्वजण आरती बोलतो . त्यानंतर संध्याकाळी आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती  बोलायला जायचो.प्रत्येकाच्या घरी जाऊन नाचायचो. असा आहे कोकणातला गणेश उत्सव.    त्यानंतर आतुरता असते ती  गौरी  आगमन आणि पूजनाची.  गौरी  आल्यानंतर दोन दिवस कसे निघून जातात तेच समजत नाही.त्यानंतर  गौरी साठी खास  नैवेद्य. भाज्या ,भाकरी ,भात ,खीर ,मोदक या सगळ्याची  चव  त्या दिवशी वेगळीच लागते. अशाप्रकारे दिवस कधी  निघून जातात तेच समजत नाही. कोकणामध्ये गणेशउत्सव साजरा क

कोकणातला हापूस आंबा

Image
कोकणामध्ये हापूस आंबा म्हटल कि एप्रिल ते जुन हा या फळांचा हंगाम आहे. आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची  लागवड केली जाते.मे महिना चालू झाला  कि लोक गावी जातात आंबे खाण्यासाठी  गावाला जातात. गावाकडे विविध प्रकारचे आंबे असतात त्यांची नाव पण वेगळीच असतात. उदा  बिटकी ,ढेपा आंबा,आमटोरा  आंबा,      जेव्हा आम्ही आंबे काडायला जायचो तेव्हा माझा एक मित्र आंबे काढण्यासाठी झाडावर चढायचा आणि मी खाली  आंबे झेलायचो. नंतर ते आंबे घरी आणून पिकण्या साठी टोपली मध्ये ठेवायचो. दोन आठवडे  झाले कि हळूहळू आंबे पिकायला लागायचे मग आम्ही आंब्याचं रस करायचो. आंबे कितीपण खावा त्याचा शरीरावर काहीच परिणाम  होत नाही. आणि आंबा हा एवढा गोड आहे कि  तुम्हाला सारखा सारखा खावासा वाटतो. म्हणून कोकणातला आंबा हा लोकप्रिय आहे .         

कोकणातले फणस

Image
साधारण एप्रिल मार्च महिना चालू झाला कि कोकणामध्ये  फणस लागायला लागतात. नंतर फणस पिकायला लागतात.कच्या  फणसापासून  कोकणामध्ये  भाजी केली जाते. आणि ती फणसाची भाजी खूप लोकप्रिय आहे.  फणसामध्ये पण दोन प्रकार असतात. एक बरखा फणस आणि एक कापा फणस पण जो कापा फणस असतो खायला खूप मस्त वाटतो. आणि कोकणामध्ये फणसाची लागवड खूप होते. आणि आपण जेव्हा पिकलेला फणस खातो त्यावेळी आपल्याला हातांना तेल लावून घ्यावे. त्यामुळे आपल्याला फणसाचा चिक लागत नाही.  अशा प्रकारे  कोकणातला फणस लोकप्रिय आहे      

माझ गाव

Image
                                             गाव म्हटल कि गावाकडली आठवण कुणाला येत नाही सर्वांनाच येते  माझ्या आठवणीतल गाव म्हणजे गुहागर तालुक्यतल गोणवली गाव .   गावाच्या चारही बाजूने निसर्गरम्य हिरवंगार डोगंर त्यात मध्ये वसलेले छोटस आमच गाव . गावाच्या मध्य भागी एक गणपतीच मंदिर आहे. त्या मंदिरा मध्ये दरवर्षी प्रमाणे सण साजरे केले जातात .   गावामध्ये  चांगली लोक , चांगली संस्कृती आहे .  गावाकडली सर्वांची घरे   कौलारू  प्रत्येकाची  भात  शेती प्रत्येकाच्या घरासमोर  नारळाच्या बागा त्यामुळे  गावातल निसर्गरम्य  त्यात हिरवेगार डोगंर  वाकडया  तिकड्या पाय वाटा. तसेच गावाकडे आंबे  ,फणस ,काजू करवंदे ,जांभूळ  पाहायला मिळते. गावामधून शांत वाहणारी नदी असं होत माझ्या स्वप्नातल गाव  

Natural beauty of village lifeगावकडली हिरवल

Image
गावकडली हिरवल आणि सुंदरता  गावकडे जी सुंदतरता आहे तशी आपल्याला मुंबईला पाहायला मिलत नाही.गावामध्ये फिरत असतना मी गावकडले काही सुंदर फोटो काडले आणि गावाकडे मोकळी हवा हिरवगार झाड़े शांतता त्यामुळे माला खुप आंनद झाला.   गावकडली भात शेती पण एवढी हिरवल आहे की अस वाटत निसर्गाने एक हिरवी चादरच पसरवलेय खुप सारी शेती आणि त्याने व्यापलेला निसर्ग त्यात पाऊस पड़ला की ते संपूर्ण दृश्य बगन्यासारख असत.अस दृष्य फ़क्त आपण कोकणातच पाहू शकतो .  

जुनं महिन्याचा पहिला पाऊस

Image
मे  महिना संपला कि सर्वांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाला  जुने महिना चालू झाला कि लोक पावसाची वाट बघत बसतात कारण पाऊस चालू झाला कि  लोकांना पेरणी करायची असते आणि जुन मधला पहिला पाऊस म्हणजे  थंडगार गारवा असतो आणि लोकांना पहिल्या पावसाचा आनंद घेता येतो.  मी सुद्धा पहिला पाऊस पडला तेव्हा बाहेर जाऊन पावसाचा आनंद घेतला पावसा मध्ये भिजलो. मित्रान सोबत पावसा मध्ये मस्तीचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही नदीवर जाऊन पाणी बगायला जात असे . आणि पहिला पाऊस पडतो तेव्हा एक प्रकारच वादळ येत पाहिल तर ढग एकमेकांवर आदळतात.  त्या ढगांच्या कडकडाटामध्ये वीज चमकायची त्यामुळे सुरवातीला खूप भीती वाटायची त्या मध्ये पावसाच्या जोरात धारा असा होता पहिला पाऊस  मी पाहिलेला . 

कोकणातल निसर्ग

Image
                                                                                                                           कोकणातल निसर्गाच वर्णन कितीही केल तरी कमीच आहे. कोकणातल निसर्ग म्हणजे देवाने दिलेली एक वर्गणीच आहे. कोकणातल्या उंच उंच पर्वतरांगा त्यात पसरलेली गवताची हिरवगार चादर तसेच  डोगरांमधून वाहनारे धबधबे ,नदया  हे निसर्गाच सौंद्रय टिकवून ठेवतात. त्यामुळे तो निसर्गाचा भाग बघतच राहवासा वाटतो. त्या निसर्गा मध्ये  इंद्रधनुष्य पाहण्याचा आनंद वेगळाच असतो . सहजा तो पाहायला मिळत नाही . त्याच प्रमाणे गावकडली भात शेती तसेच वेगवेगळी फुले त्यामुळे निसर्गाच सौंदर्य अजुन वाढत. त्यामुळे कोकणातल सौंदर्य हे कुणालाही आकर्षित करू शकते .  

मी पाहिलेला पाऊस

Image
गावाकडला पाऊस म्हटलं कि चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो.  पाऊस आला कि सर्व मुले पावसात खेळतात पावसाचा आनंद घेतात मी  लहान होतो तेव्हा  पाऊस पडायला सुरवात झाली कि  मी छोटी छोटी  धरणे बांधायचो आणि माझे सर्व मित्र आम्ही एकत्र येऊन पावसा मध्ये कब्बडी खेळायचो. त्याच प्रमाणे आम्ही नदीवर पाणी बगायला जात असे नदीवर पाणी बगायला जात असताना त्यात ढगांचा कडकडाट सुरु असे .  त्यामुळे आम्हाला भीती सुद्धा वाटायची आणि वीज सुद्धा चमकायची. आम्ही नदीकडे जात असताना पावसाचं पाणी आम्ही एकमेकांच्या अंगावर उडवायचो अशी मस्ती करत आम्ही नदी पात्रा कडे पोहोचलो .आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा नदीच्या पाण्याची पातळी बगुन आश्यर्यचकित झालो . नदीच्या बाजूच   नैसर्गिक हिरवगार दृश्य  पाहून मला खूप आनंद झाला ते दृश्य पाहून मला तिथून घरी जायच मनच नव्हत होत .  असा होता माझ्या पहिल्या पावसाचा अनुभव.