Shimga Festival 2020||कोकणातील शिमगा ,होळी ,पालखी नाचवणे

 होळी हा सण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात साजरा केला जातो . महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करण्याची पद्धत आहे. कोकणातली होळी एक दोन दिवसाची नव्हे तर संपूर्ण आठवडाभर असते. 
कोकणामध्ये शिमगा चालू झाला कि कोकण आणि गोवा या भागात सांस्कृतिक सोहळे रंगतात. संकासुर यांचं आगमन होत. गावाला प्रत्येकाच्या घरी संकासुर येतो. काही संकासुर त्यांच्या आजूबाजूच्या गावात जाऊन आपली संस्कृती दाखवतात. तिकडे जाऊन नाचतात. आपली पापरंपारिक   संस्कृती टिकवून ठेवतात.गावाच्या देवळा मध्ये पालखी सजवली जाते. गावातील सर्व लोक तिथे उपस्थित असतात . पालखी सजवून झाली का तिची पूजा करतात. मग तिला नाचवत गावामध्ये आणली जाते. गावामध्ये आणल्या नंतर पालखीला नाचवल जात मग पालखी प्रत्येकाच्या घरी घेऊन जातात तिची पूजा करतात. 
        
  कोकणात होळी काही ठिकाणी होळीच्या रात्री होळी जाळली जाते तर काही ठिकाणी सकाळी जाळी जाते. होळी जाळ्याच्या आधी होळीच्या गोल  पालखी नाचवली जाते. नंतर मग होळीला आग लावली जाते . मग काही लोक  होळीमध्ये  नारळ टाकतात. होळीभोवती फेऱ्या मारत बोंबा मारल्या जातात  अशा प्रकारे कोकणामध्ये होळी साजरी केली जाते. 
 

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती