मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

वार्षिक परीक्षा संपली कि आम्ही वाट पाहतच असतो कि कधी सुट्टी पडतेय आणि आम्ही गावी जातोय. आणि ऊन्हाळा  चालू झाला कि गर्मी पण खूप वाढते. परीक्षा संपल्या कि सर्व लोक मे महिन्यामध्ये सुट्ट्टीचा आनंद घेण्यासाठी गावी जातात. तसेच गावी गेलो खूप आंबे ,करवंद ,जांभूळ, काजू  खायला भेटतात. तसेच मे महिन्यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळायला भेटतात. गावाकडे  गेलो कि दररोज क्रिकेट खेळायला भेटायच. दुसऱ्या गावांसोबत आम्ही मैच लावायचो.तसेच गावाकडे लपाशपी,लगोरशी,विटीदांडू,चोर पोलीस आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत पत्ते खेळायचो.गावाला गेल्यावर खूप मजा करायचो. त्यात गावी गेल्यावर समुद्रावर जात असें संध्याकाळी सूर्य मावळताना बगण्याची मजा वेगळीच असते तो लाल रंगाचा सूर्य  हळूहळू केव्हा खाली डुबतो तेच समजत नाही.मग रात्र होते मग सगळे घरी जातात. मग परत  दुसऱ्या दिवशी सूर्य पूर्वेकडून उगवतो.मग मे महिन्याच्या सुट्टीत दिवस कधी निगुन जातात समजतच नाही.

गावी गेल्यानंतर आम्ही सर्वजण आंबे आणायला जंगला मध्ये जायचो. आंब झाडावर पिकलेला दिसला कि आम्ही  दगडी मारून पाडायचो.त्यामध्ये पण एक वेगळीच पद्धत असायची.जो पहिला आंबा पडणार त्याचा तो आंबा.मग आम्ही आंबे घरी आणून त्या आंब्यान पासून आम्ही त्यांचा रस बनवायचो.मग आम्ही मस्त घरच्या अंगणा मध्ये बसून त्याचा आस्वाद घेयाचो.फक्त आंबेच नव्हे तर फणस सुद्धा तितकेच खायचो.पिकलेले फणस खाऊन त्यामधल्या अठला नंतर गरम पाण्यामध्ये शिजवून खायचो.आणि कच्या फणसाची भाजी बनवली जात असे.सकाळी उठल्यावर गाई गुरांना चरायला जंगलात घेऊन जायचो.गुर चारून झाली कि त्यांना नदीवर पाणी पाजायला 
घेऊन जात असे त्यानंतर त्यांना घरी आणायचो आणि वाड्या मध्ये बांदायचो अशा प्रकारे आम्ही मजा करायचो.कधी कधी आम्ही नदीवर अंघोळ करण्यासाठी जात असे.नदीवर जाऊन  मासे पकडणे ही सुद्धा वेगळीच मजा असते.तसेच सुट्टी मध्ये खूप फिरायला भेटायचं मामाच्या गावी जायच तिकडे जाऊन मजा करायची परत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला भेटायच.रात्री लाइट सुद्धा गेली कि खूप मजा यायची.एकमेकांना काळोखातून कुणाला पण घाबरवायचो.आणि लाइट गेल्यावर एवढं शांत वाटायचं त्यात गावाकडे दिवे लावायचो.रात्री जेवून झाल्यावर मी माझ्या काकांसोबत शिकारीला जात असे रात्री शिकारीला जाताना मी खूप घाबरायचो माझ्या काकांना तर घाबरायचे पण नाहीत.आणि ती रात्र माझ्यासाठी खूप आनंदाची होती. कारण मी पहिल्यांदा शिकारीला जात होतो. तो माझ्या आयुष्यचा पहिला अनुभव होता.अशाप्रकारे मे महिन्यातली सुट्टी कधी निगुन जायची समजायच नाही अशा प्रकारे मी मे महिन्यातली सुट्टी आनंदाने घालवायचो.असा असतो आमचा सुट्टीतला मे महिना                 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

गावाकडची शेती