गावाकडचे खेळ आणि आठवणी

पंधरा वर्षांपूर्वी गावाकडे खूप खेळ खेळे जात असत. पण आता काही वर्षा मध्ये ते खेळ दिसत सुद्धा नाही आहेत. जर  आता आपण कुणाला विचारल आम्ही त्यावेळी  खूप खेळ खेळायचो त्यावेळी आम्ही चांगले चांगले खेळ खेळत  असायचो. पण ज्यांनी खेळ बघितलेच नाही ते विश्वास कसे ठेवणार.मी लहान  असताना खूप खेळ खेळायचो. उदा  लगोरशी,विटीदांडू ,गोट्या ,क्रिकेट ,कब्बडी ,लपाशपी,करवंटी आपसेस,खोखो,थाळीफेक,गोळाफेक,लांबउडी ,लंगडी पत्ते ,चोर पोलीस ,आबाधोभी ,इत्यादी  खेळ मी लहानपणी खेळे होते . माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट होता. तसेच खोखो आणि कब्बडी या खेळात मला खूप बक्षीस सुद्धा मिळालेली .
 गावाकडे खूप प्रकारचे खेळ खेळायला भेटतात. गावाकडची मोकळी मैदाने मोकळी हवा त्यामध्ये खेळ खेळण्याची वेगळीच मजा असते . पूर्वी गावमधली सर्व मुले मंदिरात येऊन खेळ खेळत असायची काही जण लपाछपी तर काही चोरपोलीस . कब्बडी असे ज्याचा त्याच्या आवडीनुसार खेळ खेळायचे पण आता ते खेळ आपल्याला खेळायला भेटत नाही. कारण लोकसंख्या वाढली माणसांचे विचार बदलले. माणुसकी संपली त्यामुळे राहिल्या त्या फक्त आठवणी .
मी  लहान असताना आमची वेळ ठरलेली असायची कि सकाळी क्रिकेट दुपारी पत्ते नाहीतर नदीवर अंघोळीला जायच ते झालं कि संघ्याकाळी  ४ वाजता परत क्रिकेट नाहीतर लपाशापी  खेळायच हे आमचं ठरलेल असायच पण आता ते खेळ खेळायला भेटत नाही.गावाकडे संपूर्ण दिवस खेळ खेळण्यात जात असे आणि कधी संध्याकाळ होत असे आम्हाला समजत सुद्धा नसे जेव्हा आई काठी घेऊन मारायला यायची तेव्हा मला समजत असे कि संध्याकाळ झाली मग घरी जायचं अंघोळ करायची आणि  परत  सर्वजण आम्ही कुणाच्या तरी घरी बसून पत्ते खेळायचो .अशाप्रकारे गावी खेळ खेळून दिवस कसे गेले तेच समजायचं नाही आत राहिल्या त्या फक्त आठवणी. त्या दिवसांची आता खूप आठवण येते.
 

Comments

Popular posts from this blog

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती