कोकणातील गणेशोउत्सव

गणेशोउत्सव हा सण  दरवर्षी प्रमाणे कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  साजरा केला जातो. गणपती हा सण जवळ आला कि मुंबई मधून खूप लोक गावाकडे जातात कारण कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी गणपती आणला जातो . प्रत्येक जण आपल्या गणपती साठी वेगवेगळी सजावट करतो. प्रत्येकाच्या देवघरात मंडपी बांधण्याची पद्धत आहे. मंडपी म्हणजे  गणपती बाप्पाच्या डोईवरचं छत. तेरडा, सुपारी, हिरणीची फुलं,दुर्वा   त्या काळात उपलब्ध असलेल्या निर्सगातल्या सुंदर  सौंदर्याने बाप्पालाही सजवलं जातं. .गणपती घरी आला कि त्याची पूजा केली जाते.पूजा करून झाल्यावर मग आम्ही सर्वजण आरती बोलतो . त्यानंतर संध्याकाळी आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती  बोलायला जायचो.प्रत्येकाच्या घरी जाऊन नाचायचो. असा आहे कोकणातला गणेश उत्सव.   




त्यानंतर आतुरता असते ती गौरी आगमन आणि पूजनाची. गौरी आल्यानंतर दोन दिवस कसे निघून जातात तेच समजत नाही.त्यानंतर गौरीसाठी खास नैवेद्य. भाज्या ,भाकरी ,भात ,खीर ,मोदक या सगळ्याची  चव  त्या दिवशी वेगळीच लागते. अशाप्रकारे दिवस कधी  निघून जातात तेच समजत नाही. कोकणामध्ये गणेशउत्सव साजरा करण्याची मजाच वेगळी असते.    



  https://www.youtube.com/watch?v=LkgIGfi0biE&t=1s

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती