कोकणातला हापूस आंबा

कोकणामध्ये हापूस आंबा म्हटल कि एप्रिल ते जुन हा या फळांचा हंगाम आहे. आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची  लागवड केली जाते.मे महिना चालू झाला  कि लोक गावी जातात आंबे खाण्यासाठी  गावाला जातात. गावाकडे विविध प्रकारचे आंबे असतात त्यांची नाव पण वेगळीच असतात. उदा  बिटकी ,ढेपा आंबा,आमटोरा  आंबा,
    

जेव्हा आम्ही आंबे काडायला जायचो तेव्हा माझा एक मित्र आंबे काढण्यासाठी झाडावर चढायचा आणि मी खाली  आंबे झेलायचो. नंतर ते आंबे घरी आणून पिकण्या साठी टोपली मध्ये ठेवायचो. दोन आठवडे  झाले कि हळूहळू आंबे पिकायला लागायचे मग आम्ही आंब्याचं रस करायचो. आंबे कितीपण खावा त्याचा शरीरावर काहीच परिणाम  होत नाही. आणि आंबा हा एवढा गोड आहे कि  तुम्हाला सारखा सारखा खावासा वाटतो. म्हणून कोकणातला आंबा हा लोकप्रिय आहे .     

   

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती