हिरवगार डोंगरातून वाहणारे कोकणचे धबधबे

कोकणातील  हिरवेगार डोंगर आणि त्या डोंगरांमधून वाहणारे सुंदर  धबधबे  कोकणातील पावसामुळे कोकणचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत.  कोकणामध्ये पाऊस पडायला लागला कि पावसाळी पर्यटना साठी लोकांची गर्दी कोकणात होते. कोकणामध्ये  एवढे धबधबे  आहेत कि सांगताच येत नाही. मी गावी असताना पाहिलेला छोटासा दाट हिरवगार जंगलातून वाहणारा धबधब्याचे  सौंदर्य पाहून माझ मन आनंददायी झाल. 
 पावसाळ्यात धबधबा लांबून पहिला तर असं वाटत कि दोन डोंगरण मधून दूध पडतय.  कारण त्याचा रंग एवढा पांढरा असतो कि लांबून पाहिल्यावर वाटत दूधच पडतय.  धबधब्यांमध्ये भिजण्याचा त्यात अंगोळ करण्याची माझ्या वेगळीच असते. हेच छोटे  छोटे  धबधबे मिळून एक मोठी नदी तयार होते.  काही धबधबे एवढे मोठे आहेत त्यांना बगण्याचा आनंद आपण लांबूनच घेऊ शकतो . आपण धबधब्याच्या  बाजूला असलो कि तिथून घरी जायच मनच होत नाही. असा होता मी पाहिलेला धबधबा. 

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती