कोकणातील करवंद

एप्रिल मे महिना चालू झाला कि करवंद पिकायला सुरवात होते. जेव्हा करवंद कच्चे असतात तेव्हा आपण त्यांच्यापासून चटणी बनवू शकतो. जेव्हा करवंद कच्चे असतात तेव्हा त्यांचा रंग हिरवा असतो. आणि पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. पिकलेली करवंद खायला एवढी गोड असतात कि तुम्ही पोटभर खात बसाल. आणि काही करवंद आंबट सुद्धा असतात. आम्ही करवंद आणायला जंगला मध्ये जायचो तेव्हा करवंद काढायचो तेव्हा हातांना काटे लागायचे. ते संपूर्ण झाड काटेरी असायच म्हणून करवंद काढताना थोडी काळजी घ्यावी.पिकलेल्या  करवंदना चांगल सुकवून आपण त्यांना खाऊ शकतो. आणि आपण सुकवलेली करवंद दोन तीन महिने खराब होत नाही.कोकणामध्ये एप्रिल आणि मे हा करवंदांचा हंगामा आहे. कोकणामध्ये करवंद खूप पाहायला मिळतात. 


         

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती