मी पाहिलेला पाऊस


गावाकडला पाऊस म्हटलं कि चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो.  पाऊस आला कि सर्व मुले पावसात खेळतात पावसाचा आनंद घेतात मी  लहान होतो तेव्हा  पाऊस पडायला सुरवात झाली कि  मी छोटी छोटी  धरणे बांधायचो आणि माझे सर्व मित्र आम्ही एकत्र येऊन पावसा मध्ये कब्बडी खेळायचो. त्याच प्रमाणे आम्ही नदीवर पाणी बगायला जात असे नदीवर पाणी बगायला जात असताना त्यात ढगांचा कडकडाट सुरु असे. त्यामुळे आम्हाला भीती सुद्धा वाटायची आणि वीज सुद्धा चमकायची. आम्ही नदीकडे जात असताना पावसाचं पाणी आम्ही एकमेकांच्या अंगावर उडवायचो अशी मस्ती करत आम्ही नदी पात्रा कडे पोहोचलो.आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा नदीच्या पाण्याची पातळी बगुन आश्यर्यचकित झालो. नदीच्या बाजूच  नैसर्गिक हिरवगार दृश्य पाहून मला खूप आनंद झाला ते दृश्य पाहून मला तिथून घरी जायच मनच नव्हत होत. असा होता माझ्या पहिल्या पावसाचा अनुभव. 
   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती