Posts

Natural beauty of village lifeगावकडली हिरवल

Image
गावकडली हिरवल आणि सुंदरता  गावकडे जी सुंदतरता आहे तशी आपल्याला मुंबईला पाहायला मिलत नाही.गावामध्ये फिरत असतना मी गावकडले काही सुंदर फोटो काडले आणि गावाकडे मोकळी हवा हिरवगार झाड़े शांतता त्यामुळे माला खुप आंनद झाला.   गावकडली भात शेती पण एवढी हिरवल आहे की अस वाटत निसर्गाने एक हिरवी चादरच पसरवलेय खुप सारी शेती आणि त्याने व्यापलेला निसर्ग त्यात पाऊस पड़ला की ते संपूर्ण दृश्य बगन्यासारख असत.अस दृष्य फ़क्त आपण कोकणातच पाहू शकतो .  

जुनं महिन्याचा पहिला पाऊस

Image
मे  महिना संपला कि सर्वांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाला  जुने महिना चालू झाला कि लोक पावसाची वाट बघत बसतात कारण पाऊस चालू झाला कि  लोकांना पेरणी करायची असते आणि जुन मधला पहिला पाऊस म्हणजे  थंडगार गारवा असतो आणि लोकांना पहिल्या पावसाचा आनंद घेता येतो.  मी सुद्धा पहिला पाऊस पडला तेव्हा बाहेर जाऊन पावसाचा आनंद घेतला पावसा मध्ये भिजलो. मित्रान सोबत पावसा मध्ये मस्तीचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही नदीवर जाऊन पाणी बगायला जात असे . आणि पहिला पाऊस पडतो तेव्हा एक प्रकारच वादळ येत पाहिल तर ढग एकमेकांवर आदळतात.  त्या ढगांच्या कडकडाटामध्ये वीज चमकायची त्यामुळे सुरवातीला खूप भीती वाटायची त्या मध्ये पावसाच्या जोरात धारा असा होता पहिला पाऊस  मी पाहिलेला . 

कोकणातल निसर्ग

Image
                                                                                                                           कोकणातल निसर्गाच वर्णन कितीही केल तरी कमीच आहे. कोकणातल निसर्ग म्हणजे देवाने दिलेली एक वर्गणीच आहे. कोकणातल्या उंच उंच पर्वतरांगा त्यात पसरलेली गवताची हिरवगार चादर तसेच  डोगरांमधून वाहनारे धबधबे ,नदया  हे निसर्गाच सौंद्रय टिकवून ठेवतात. त्यामुळे तो निसर्गाचा भाग बघतच राहवासा वाटतो. त्या निसर्गा मध्ये  इंद्रधनुष्य पाहण्याचा आनंद वेगळाच असतो . सहजा तो पाहायला मिळत नाही . त्याच प्रमाणे गावकडली भात शेती तसेच वेगवेगळी फुले त्यामुळे निसर्गाच सौंदर्य अजुन वाढत. त्यामुळे कोकणातल सौंदर्य हे कुणालाही आकर्षित करू शकते .   ...

मी पाहिलेला पाऊस

Image
गावाकडला पाऊस म्हटलं कि चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो.  पाऊस आला कि सर्व मुले पावसात खेळतात पावसाचा आनंद घेतात मी  लहान होतो तेव्हा  पाऊस पडायला सुरवात झाली कि  मी छोटी छोटी  धरणे बांधायचो आणि माझे सर्व मित्र आम्ही एकत्र येऊन पावसा मध्ये कब्बडी खेळायचो. त्याच प्रमाणे आम्ही नदीवर पाणी बगायला जात असे नदीवर पाणी बगायला जात असताना त्यात ढगांचा कडकडाट सुरु असे .  त्यामुळे आम्हाला भीती सुद्धा वाटायची आणि वीज सुद्धा चमकायची. आम्ही नदीकडे जात असताना पावसाचं पाणी आम्ही एकमेकांच्या अंगावर उडवायचो अशी मस्ती करत आम्ही नदी पात्रा कडे पोहोचलो .आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा नदीच्या पाण्याची पातळी बगुन आश्यर्यचकित झालो . नदीच्या बाजूच   नैसर्गिक हिरवगार दृश्य  पाहून मला खूप आनंद झाला ते दृश्य पाहून मला तिथून घरी जायच मनच नव्हत होत .  असा होता माझ्या पहिल्या पावसाचा अनुभव.