Posts

Showing posts from May, 2020

गावाकडचे खेळ आणि आठवणी

Image
पंधरा वर्षांपूर्वी गावाकडे खूप खेळ खेळे जात असत. पण आता काही वर्षा मध्ये ते खेळ दिसत सुद्धा नाही आहेत. जर  आता आपण कुणाला विचारल आम्ही त्यावेळी  खूप खेळ खेळायचो त्यावेळी आम्ही चांगले चांगले खेळ खेळत  असायचो. पण ज्यांनी खेळ बघितलेच नाही ते विश्वास कसे ठेवणार.मी लहान  असताना खूप खेळ खेळायचो. उदा  लगोरशी,विटीदांडू ,गोट्या ,क्रिकेट ,कब्बडी ,लपाशपी,करवंटी आपसेस,खोखो,थाळीफेक,गोळाफेक,लांबउडी ,लंगडी पत्ते ,चोर पोलीस ,आबाधोभी ,इत्यादी  खेळ मी लहानपणी खेळे होते . माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट होता. तसेच खोखो आणि कब्बडी या खेळात मला खूप बक्षीस सुद्धा मिळालेली .  गावाकडे खूप प्रकारचे खेळ खेळायला भेटतात. गावाकडची मोकळी मैदाने मोकळी हवा त्यामध्ये खेळ खेळण्याची वेगळीच मजा असते . पूर्वी गावमधली सर्व मुले मंदिरात येऊन खेळ खेळत असायची काही जण लपाछपी तर काही चोरपोलीस . कब्बडी असे ज्याचा त्याच्या आवडीनुसार खेळ खेळायचे पण आता ते खेळ आपल्याला खेळायला भेटत नाही. कारण लोकसंख्या वाढली माणसांचे विचार बदलले. माणुसकी संपली त्यामुळे राहिल्या त्या फक्त आठवणी . मी  लहान असताना आमची वेळ ठरलेली असायची कि सकाळ

कोकणची लालपरी

Image
कोकणच्या लालपरीने केलेला प्रवास  प्रत्येकाच्या जीवनातला प्रवास हा एसटीने होत असतो. कोकणामध्ये तिला कोकणची लालपरी  असे म्हटले जाते. गावापासून ते मुंबईपर्यँत आपण सर्व एसटीने  प्रवास करतो. गणपती मध्ये मोठ्या प्रमाणात गावी जाण्यासाठी एसटींची बुकिंग केली जाते. मुबई मधून मोठ्या प्रमाणात कोकणची लाल परी कोकणाकडे रवाना होतात . मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पणे पोचवतात. तुम्ही कोकणामध्ये गेलात तर तुम्हाला सर्व ठिकाणी कोकणच्या लालपऱ्या पाहायला मिळतील. गावाकडे कुठेही कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर लालपरीनेच प्रवास करावा लागतो. आपल्या आयष्यातील सर्वात मोठा वाट म्हणजे कोकणची लालपरी म्हणून ती खूप लोकप्रिय आहे . आपल्या प्रवासात आपल्याला सांभाळून घेऊन जाणारी आपली लालपरी आहे. गावाकडे शाळेत जाण्यासाठी दररोज सकाळी ९ वाजता शाळेत जाण्यासाठी एसटी यायची तसेच कॉलेजच्या मुलांना त्या वेळेत कॉलेज मध्ये घेऊन जात असे . अशा प्रकारे कॉलेज सुटल्यावर पण मुलांना घरी जाण्यासाठी एसटी असायची. कोकणामध्ये कुटलाही सण असला तरी मुंबई  मधून गावी जाण्यासाठी  एसटी असायची. गावाकडून ते मुंबई पर्य

शाळेतील दिवस... काही आठवणी...शालेय जीवनातील गमतीजमती ..

Image
शाळा आणि शाळेतील दिवस प्रत्येकाच्या जीवनातील अगदी जवळच नात आहे. प्रत्येकाच्या जीवनाची  पहिली पायरी म्हणजे शाळा.शाळेतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. मी जेव्हा शाळेमध्ये जायचो तेव्हा शाळेमध्ये खूप मस्ती करायचो. मित्रां सोबत मस्ती करायला भेटायची. कुणाला काहीतरीचिडवणे त्याच्या पाठीमागून डोक्यात मारणे खूप माझ्या  ही आमची दररोजची मजा असायची.शाळेत असताना सरांनी आम्हाला खूप मारलेल अजून  आम्ही विसरलो नाही आहे. शाळेमध्ये असताना आम्ही कब्बडी ,खोखो,क्रिकेट ,विटीदांडू ,थाळीफेक,लांबवुडी, गोळाफेक,धावण्याच्या  स्पर्धा  लावत असो.कधी चुकून शाळेत असणारे मित्र वाटेत अचानक भेटतात आणि एकमेकांबदल विचारपूस करतात. त्यामध्ये काही शाळेतील काही गोष्टींची आठवण येते. काही चांगले प्रसंग आठवतात.शाळेतले काही काही शिक्षक खूप चांगले असायचे. शाळेमध्ये लेट  गेलो तरी काही बोलायचे नाही. काही तर मारायचे पण आणि वर्गाच्या बाहेर बसवून ठेवायचे. अभ्यास नाही केला तर मार पण खायचे वर्गाच्या बाहेर वणवा उभे करायचे. आणि परत  दुसऱ्या दिवशी पालकांना घेऊन यायचं. मग घरी गेल्यावर परत मार खायचे. अशा होत्या शाळेतील आठवणी.तसेच श

कोकणच्या काजू

Image
एप्रिल आणि मे ह्या महिन्यात काजूंचा हंगाम असतो. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात काजू पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर काजूंची लागवड केली जाते. मार्च एप्रिल या महिन्यात काजुना  तोरण येते . काजूंचा उपयोग खूप ठिकाणी केला जातो. ओल्या काजूनपासून  भाजी तयार करता येते. आपण सुकलेल्या काजू  भाजून खाऊ शकतो. कोकणात  सध्या   काजू लागवडीस अनुकूल हवामान व जमीन तसेच बाजारात जास्त भाव मिळत आहे. म्हणून कोकणातला शेतकरी काजू लागवडीकडे जास्त आकर्षित झाला आहे. काजूच्या चांगल्या वाढीसाठी व अधिक  स्वच्छ  सूर्यप्रकाशाची गरज असते.  

गुहाघर समुद्र किनारा

Image
गुहाघर समुद्र सुंदर निसर्गाने व्यापलेला आहे.सर्वात जास्त आनंद आणि खुली हवा हि फक्त आपल्याला समुद्रावर भेटते. समुद्रावर फिरण्याची खरी मजा ही संध्याकाळची असते. कारण संध्याकाळी सूर्य मावलतांना तो लाला भडक रंगाचा दिसतो. काही लोक तर खूप लांबचा प्रवास करून समुद्र पाहण्यासाठी येतात.समुद्रावरती मोकळी हवा लाटांची सळसळ  शांत वातावरण आणि समुद्राच्या किनारी बसून नारळ पाणी पियाला खूप मस्त वाटत . समुद्राच्या रेतीवर किल्ले बनवणे रेतीमध्ये वेगवेगळ्या कलाकृती करणे. तसेच समुद्रावर जाऊन फोटोशूट करणे खूप लोकप्रिय आहे.अशाप्रकारे मी समुद्रावर मजा केली होती