कोकणची लालपरी

कोकणच्या लालपरीने केलेला प्रवास 

प्रत्येकाच्या जीवनातला प्रवास हा एसटीने होत असतो. कोकणामध्ये तिला कोकणची लालपरी  असे म्हटले जाते. गावापासून ते मुंबईपर्यँत आपण सर्व एसटीने  प्रवास करतो. गणपती मध्ये मोठ्या प्रमाणात गावी जाण्यासाठी एसटींची बुकिंग केली जाते. मुबई मधून मोठ्या प्रमाणात कोकणची लाल परी कोकणाकडे रवाना होतात . मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पणे पोचवतात. तुम्ही कोकणामध्ये गेलात तर तुम्हाला सर्व ठिकाणी कोकणच्या लालपऱ्या पाहायला मिळतील. गावाकडे कुठेही कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर लालपरीनेच प्रवास करावा लागतो. आपल्या आयष्यातील सर्वात मोठा वाट म्हणजे कोकणची लालपरी म्हणून ती खूप लोकप्रिय आहे . आपल्या प्रवासात आपल्याला सांभाळून घेऊन जाणारी आपली लालपरी आहे. गावाकडे शाळेत जाण्यासाठी दररोज सकाळी ९ वाजता शाळेत जाण्यासाठी एसटी यायची तसेच कॉलेजच्या मुलांना त्या वेळेत कॉलेज मध्ये घेऊन जात असे . अशा प्रकारे कॉलेज सुटल्यावर पण मुलांना घरी जाण्यासाठी एसटी असायची. कोकणामध्ये कुटलाही सण असला तरी मुंबई  मधून गावी जाण्यासाठी  एसटी असायची. गावाकडून ते मुंबई पर्यंत सर्व प्रवास हा लालपरीने होत असे.
   

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती