शाळेतील दिवस... काही आठवणी...शालेय जीवनातील गमतीजमती ..

शाळा आणि शाळेतील दिवस प्रत्येकाच्या जीवनातील अगदी जवळच नात आहे. प्रत्येकाच्या जीवनाची  पहिली पायरी म्हणजे शाळा.शाळेतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. मी जेव्हा शाळेमध्ये जायचो तेव्हा शाळेमध्ये खूप मस्ती करायचो. मित्रां सोबत मस्ती करायला भेटायची. कुणाला काहीतरीचिडवणे त्याच्या पाठीमागून डोक्यात मारणे खूप माझ्या  ही आमची दररोजची मजा असायची.शाळेत असताना सरांनी आम्हाला खूप मारलेल अजून  आम्ही विसरलो नाही आहे. शाळेमध्ये असताना आम्ही कब्बडी ,खोखो,क्रिकेट ,विटीदांडू ,थाळीफेक,लांबवुडी, गोळाफेक,धावण्याच्या  स्पर्धा  लावत असो.कधी चुकून शाळेत असणारे मित्र वाटेत अचानक भेटतात आणि एकमेकांबदल विचारपूस करतात. त्यामध्ये काही शाळेतील काही गोष्टींची आठवण येते. काही चांगले प्रसंग आठवतात.शाळेतले काही काही शिक्षक खूप चांगले असायचे. शाळेमध्ये लेट  गेलो तरी काही बोलायचे नाही. काही तर मारायचे पण आणि वर्गाच्या बाहेर बसवून ठेवायचे. अभ्यास नाही केला तर मार पण खायचे वर्गाच्या बाहेर वणवा उभे करायचे. आणि परत  दुसऱ्या दिवशी पालकांना घेऊन यायचं. मग घरी गेल्यावर परत मार खायचे. अशा होत्या शाळेतील आठवणी.तसेच शाळेत असताना दुपारच्या मधल्या सुट्टीत आम्ही एकमेकांचे  डबे खात असो. त्यानंतर थोडा वेळ  खेळायचो. मधली सुट्टी संपली कि वर्गात जाऊन बसायचं मग गणितचा तास असायचा आणि मला तो विषय नाही आवडायचा गणिताचे सर आले कि माझा वाईट वेळ चालू  होत असे. आणि गणिताचा आणि माझा छत्तीसचा आकडा असायचा. तास चालू झाला कि मी वाट बगत बसायचो कि कधी तास संपतोय. अशा होत्या शाळेतील आठवणी
          

Comments

Popular posts from this blog

गावाकडचे खेळ आणि आठवणी

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

गावाकडची शेती