Posts

Showing posts from July, 2020

कोकणातली भात लावणी ।। kokan Farming

Image
कोकणामध्ये भात लावणी सहजा जुन आणि जुलै महिन्यात केली जाते. जर पाऊस जास्त असेल तर कोकणातील लोक भात लावणीला सुरवात करतात . भात लावणी करण्यासाठी जिथे लावणी होणार आहे त्या भागात पाणी सोडून त्यावर नांगर धरला जातो आणि जमीन भुसभुशीत केली जाते. जमीन संपूर्ण पणे भुसभुशीत होणे म्हणजे संपूर्ण जमिनीत चिखल केला जातो .त्यानंतर आपण जी पेरणी केलेली असते तिथे रोप  आलेली असतात . ती रोप उपटून आपण त्याचे मूठ तयार करायचे आणि ज्या भागामध्ये चिखल  केलेला असतो तिथे सर्व रोपे थोड थोड अंतर ठेवून आपण भात  लावणी करतो.त्यामुळे आपल्याला जास्त उत्पादन मिळते.अशाप्रकारे कोकणामध्ये पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते .संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भात  लावणी केली जाते.